Todays Post

 • A Subhash Thorat Posted a Poem at 06/05/2015
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • सायकलवर फिरता फिरता गुण गुण्याला लागलो । गुण गुणर्या शब्दांना कागदावर लिहु लागलो । असच लिहता लिहता कविता करु लागलो । फेसबुकच्या पानावर कविता छापु लागलो । सायकलवर फिरत फिरत दुध वाटत होतो । दुध वाटता वाटता मैत्री वाढवत गेलो । सायकलच्या मैत्री मुळे चरबी कधी वाढली नाही । वजन वाढीची व्याधी अघाप तरी लागली नाही । सुभाष एम थोरात चाळीसगाव दादर हुन

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 12/04/2015
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • वास्तवाच्या पलीकडे कधी गेलोच नाही । भुत आणि भविष्य कधी पाहिलच नाही । आहे त्या वर्तमानात जगत मी गेलो । आयुष्याचा प्रत्येक पडाव हसत खेळत पार करत गेलो । हसायच खेळायच नाही कोणाला दुखवायच . जीवन हे मिळाले आहे सहजतेने जगायच . सुभाष एम थोरात चाळीसगाव १८/०४/२०१५ जात पात धर्मात, मानव वाटला गेला । देशाच्या प्रगतीला, अडथळा करत गेला । समान नागरी कायदा संविधानात जरी असला । मतांच्या राजकारणात देश कुठे चालला ।

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 14/04/2015
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • पहा पटत का ? सत्याला सामोरे जाण्यासाठी , सत्य हे स्विकारावे लागते . असले जरी किती कडु तरी गिळावे लागते . जयंती पुण्यातीथी सारे साजरी करतात. पुन्हा जन्म घ्यावा अशी मागणी करतात. शिकवण त्यांनी दिली त्याचे आचरण करावे. स्वत:च्या कर्तुत्वातुन महामानव बनावे .

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 15/04/2015
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • एक दिवसाच्या मरणा साठी कित्येक वर्ष जगत आलो । जगता जगता वर्षा काठी कित्येक श्वासांना मारत गेलो । श्वासाच्या ताला वरती क्षणा क्षणाला नाचत गेलो । नाचता नाचता या धरती वरती वेकुंठात कित्येक जिवाना सोडुन आलो । एक दिवसाच्या मरणा साठी सार काही करत आलो ।

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 11/04/2015
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • बोल हे मानचे ! अपेक्षा न ठेवता कार्य आपले करत राहवे, कोण काय मनेल या पासुन दुर राहवे . व्यक्त होत राहणे हि स्वभाविक असते, मनाला काही लावुन घेण त्रासदायी असते. लाईक आणि काँमेन्ट याचा विचार नका करु, आप आपले लेखन येथे नियमीत ठेवा सुरु . सार काही येथे अभासी असत. जवळ असुन सुध्दा हाती काही नसत . काळा पुरती करमणुक म्हणुन सारे काही ठिक आहे, आहारी कशाचा गेलात तर दुख जवळ आहे.

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 28/03/2015
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • येणे म्हणजे जाणे असते सत्य जीवनाचे गाणे असते । स्मरण असावे या गाण्याचे जीवन जगावे निर्मळ मनाने

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 30/03/2015
 • पहा योग्य आहे का
 • पुस्तक वाचण जितके सोपे आहे तितकेच मानसाला वाचण कठिण आहे . अक्षर बारिक जरी असली तरी समजु शकतो, चेहर्या वरचे भाव समजुन घ्यायला कठिणच असतात. स्क्रीन वर सारे वाचत जावे, इन बाँक्स पासुन दुर राहवे . शब्दातुन येथे व्यक्त व्हावे, मनाला काही लावुन नाही घ्यावे . ---- येथे कोण काय बोलेण याचा भरोसा नाही, बोलण्या कडे दुर लक्ष केलेलेच बरे .

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 30/12/2013
 • पहा जमल का ? सांगा सत्य आहे का ?
 • ईकडे तिकडे सारी कडे ये नाही ते पोस्ट केल जात. कोठे सीन, कोठे लाईक , तर कोठे अभिप्राय दिसत असतो. कविता काय, चित्र काय, असतात कधी लेख. नाही काही जमल तर , काँपी अन पेस्ट. हा ग्रुप, तो ग्रुप ग्रुप आहेत फार. प्रत्येक ग्रुपवर असतात. सदस्य तेच तेच फार. किमया ही फेसबुकची, वाढु लागली फार. २०१३ चा संपत आहे काळ, २०१४ मध्ये येईक का सुकाळ.

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 06/12/2013
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • काय आहे तुझे ! होतच काय तुझ तर तु घेउन जाणार आहे. रिकामा आला आहेस, आणि रिकामच जाणार आहे. सार तुला कळत रे, पण वळत मात्र काही नाही. असा कसा मानुस तु मरणाला ही घाबरत नाही. मरण हे सत्य आहे, आल्याशिवाय राहणार नाही. सार काही कमवल तरी सोडुन जाण्याशिवाय पर्याय नाही

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 22/11/2015
 • पहा पटत का ?
 • आयुष्याचा गणित म्हटल की वयाची १०० री गाठणे. या काळात बाळ पणा पासुन ते म्हातार पणा पर्यत आपल्याला या धर्ती पसुन बरच काही मिळत असत. जन्मा पासुन मरे पर्यत देवाण घेवान ची एक निरतन अशी प्रक्रिया चालु असते. हीच प्रक्रीया कधी व्यवहार म्हणुन केली जाते, तर कधी आपुलकी व सेन्हा मुळे केली जाते. आपले पण जपाण्याचा एक प्रयास याच व्यवहारत अडकुन पडतो. सत्या पासुन मात्र आपण फार दुर असतो. खर सांग्याच तर हे सत्य तपासण्याची आपल्याला कधी गरज पडत नसते. कारण आपणच कोठे तरी आपल्या स्टेटस, वैभव, अंहकार, पद प्रतिष्ठा , या चक्रव्हयुत फसलेले असतो. अनुभवारुन हे लक्षात येते की आपल्या अवती भवतीच हे जग , हे नाते किती स्वार्थी असत. आपण फसतो ही तर आपल्याच जवळ्याच्या मानसा कडुन. वर्षानु वर्ष संसार केल्या नंतर ही कोठे तरी आपल्याला जाणवत की आपल्या मनातील बर्याच गोष्टी अपुर्ण असतात. स्वभाव दोष मुळे त्या टाऴ्या जातात. रिकामे आलो रिकामे जाणार हे सत्य माहीत असुनही आपण मोह मायाच्या जाळ्यात अडकुन अनाठायी पैसा वेभव याच्यात फसत असतो. देण्या पेक्षा घेण्याची प्रव्रुती वाढत असते. जेव्हा मन व विचार जुळतात तेव्हा एक मेकांचा आधार हवासा वाटत असतो. पण आयुष्य जगताना जर आपण सुर्याकडे पाहीले तर प्रामुख्याने हे लक्षात येते की या ब्रमाण्डाला चालविणारा या सुर्याला ही मर्यादा पाळाव्या लागतात आणि संध्याकाळ होताच त्याला ही अडोशाला जावे लागते. याच सिध्दांतवर जर आपण आपल आयुष्याकडे पाहीले तर पन्नासी पर्यत अर्जन करावे व पन्नासी नतर देण्याचे कार्य करावे. आता प्रयत जे काही मिळाले, कमविले आहे ते आता परत करण्याची वेळ आली आहे . म्हणुन शक्य जे काही आहे ते देत राहवे. मग ते छोटेसे शब्द ही असतील की ज्या मुळे आपल्याला ही समाधन मिळेल हे नक्कीच . शबदांन मुळे सार काही शक्य होत असत, दुर असले तरी मन,आपल्या आवडी कडे वळत असत.

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 22/11/2013
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • रचना ! याला त्या काय म्हणावे आपणच आपले आकलन करावे. जीवन हे मिळाले आहे त्यालाच आपण राम म्हणावे. सत्य स्वरुप रुप त्याचे, श्र्वासात आपल्या भजत जावे जीवन हे मिळाले म्हणुन जनसेवे साठी अर्पीत करावे. याला त्याला काय म्हणावे, आपणच आपले सुधरुन घ्यावे. जाता जाता या दुनियेतुन, सतक्रम हे देवुन जावे. जमीन, जायदाद, धनदौलत, या धर्ती मातेस देवुन जावे.

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 20/10/2013
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • असच काही होत असत, जेव्हा प्रेम होत असत हो जेव्हा तु होकार दिलास तेव्हाच मीच बावरी झाली तुझ्या भेटीसाठी बघ किती रे मी आतुर झाली. कळत रे एक मेकाला आपल भेटण शक्य नाही कारण मी या तिरी आणि तु त्या तिरी.

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 18/10/2013
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • पहा पटल तर हो म्हणा ! स्विकारण फार सोपे असते आचरण तेवढेच कठीण असते. स्विकारलेच कधी असते तर वादच येथे झाले नसते. याची त्याची निंदा करणे शिकवण नाही धर्माची. जगा आणि जगु घा ही महती आहे बोध्दाची. मानुस म्हणुन जन्म होतो हाच खरा फंडा आहे. जगा आणि जगु घा हेच शेवटी सांगण आहे

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 14/10/2013
 • मराठी काव्य धारा / चारोळ्या
 • काय म्हणावे समजत नाही ! कधी कधी असच होत असत प्रफुल असलेल जीवन उदास असत का असत का होत हे समजण्या पलीकडच असत कधी परिवारिक समस्या तर कधी पती पत्नितले गैरसमज पुरुषी अंहकार पत्नी बेजार. का कशाला शिकतो हेच समजत नाही. कधी वाटत अनाडी तरी बरे मायेचा पाझर असतो पैसा नसेल वैभव नसेल मानसीक ताण दुर असेल शेवटि अपवाद हे असणारच पण समाजात वावरतांना काही अनुभव असे असतात की मनाल प्रश्न पडतात. काही पती देव बाप जरी झाले तरी पत्नीच्या छोट्या छोट्या कामाला ही आईचा सल्ला पत्नी उदास पती बिनधास्त

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 02/10/2013
 • जीवन तंत्र
 • जिवन हे जगणे आहे जगावेच लागते. आसु असो वा हसु हे पचावेच लागते ! छोट्याशा शब्दाने जर हसवता आल, मी म्हणतो जीवन माझ धान्य झाल. फेसबुकच्या तंत्र युगात मित्र होतात फार, हसविणारे भेटत असतात फारच थोडे फार . ती असो वा तो जोडी येथे जमते, कळत नकळत हसण्यात रमते खरच सांगतो मनात असते एकच आस, भेटण्या साठी तुला मन सतत करत प्रयास.

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 02/10/2013
 • देवा देवा
 • देवा देवा तुझा हा चमत्कार कसा, ऋध्यात असुन तु दगडात कसा . !! धू !! दगडाला फोडुन फोडुन तुला घडवितो चार भिंतीच्या आत तुला बसवितो. !! देवा देवा !! तुझ्या नावाने बोकडा मारला जातो, मुख्या प्राण्याचा नैवध कसा तु खातो. !! देवा देवा !! तुझ्या साठी प्राण्याला माराव का , तुच सांग देवा हे खर आहे का . !! देवा देवा !! अ़धश्रध्देच्या खाई मध्ये मानव जात फसली, याची का रे तु काळजी नाही घेतली. !! देवा देवा !! संताना ही आम्ही रे दगडात घडविल, तुझ्या सा्रख मंदिरात संताना बसविल !! देवा देवा !! आता तरी दाखव देवा तुझा चमत्कार, मानसाच्या ऋध्यात घडव साक्षात्कार . देवा देवा तुझा हा चमत्कार कसा, ऋध्यात असुन तु दगडात कसा . !! धू !!

 • 2

 • A Subhash Thorat Posted a Poem at 29/08/2013
 • आठवण
 • नाही म्हटल तरी आठवण ही येत असते. जेथे मिळतात मने तेथे ती नेहमीच असते. आठवणिची घौड दौड नेहमी सुरू असते. ज्यची करतो आठवण ती जवळ कधीच नसते. वाटत तिला ही बोलाव कधी आठवणी ती भेटत नसते कधी मनातल्या मनात आठवण फिरत असते स्वत:च आपली आपल्याला समजुन घेत असते. घेशील का समजुन माझ्या आठवणिला देशील का साथ माझ्या प्रेमाला. वाट तुझी पाहतो हे सांगु कस. मनातल्या माझ् बोलु तरी कस.

 • 2

Read More »